पुणे १सप्टेंबर:- पुणे पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदारांना 12 तास ड्युटी ऐवजी 8 तासाच ड्युटी करावी लागणार आहे.१२तास ड्युटी मुळे त्याचा परिणाम कौटुंबिक जबाबदारीवर होत असल्याने. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला अंमलदारांसाठी आता 8 तासच कर्तव्याची सुविधा 1 सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे.महिला पोलिसांना सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्त वर्षभरातून अनेकवेळा ज्यादा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर याचा परिणामाबरोबर कर्तव्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महिला अंमलदारांना येणाऱ्या अडचणींचा सहानभूतीपूर्वक विचार करून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना हा प्रायोगिक तत्वावर ही अमंलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिलांना 1 सप्टेंबरपासून आठ तासच कर्तव्यावर हजर रहावे लागणार आहे. या निर्णयाचे महिला पोलिस अंमलदारांनी स्वागत केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुरूष अंमलदारांनादेखील आठ तासांचे ड्युटी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.