पुणेे१५ऑगस्ट:-नो पार्किंग झोन ठिकाणी वाहने उभी करणे,वाहुतकीला अडथळा होईल अश्या ठिकाणी वाहने पार्किंग करणाऱ्या विरुद्ध वाहन जप्तीची कारवाई पोलिसांकडून होत राहते.,परंतू पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चक्क वाहन पार्किंग करीत असताना, एका दुचाकी स्वाराला,दुचाकीवर बसलेला असतांना टोइंग पथकाच्या वाहनात टाकल्याचा मुजोरीपणा पुणे पोलिसांनी, केल्या प्रकारचा व्हिडिओ शोषल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा प्रकार पुण्यातील नानापेठ परिसरातील आहे.पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये टाकल्याची ही घटना १९ऑगस्टच्या दुपारची आहे. या घटनेनंतर नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात असला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या बाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात सर्वात जास्त दुचाकी संख्या असल्याची नोंद परिवहन विभागाच्या दप्तरी असून,अशातच वाहनचालकांच्या जर, काही चुका होत असतील, चुकत असेल तर अशा चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसांनी करणं, तरी कुठंपत योग्य आहे? अशा कारवाई वेळी जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला जात आहे. अशातच पुणे शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असल्याने कायद्याचे रक्षकच असं कृत्य करीतल, जनतेनं कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
.