विदर्भ

पातुर नगर परिषदच्या सांस्कृतिक सभागृहाची दुरावस्था

पातुर : नगरपरिषद क वर्गात मोडत असून पातुर शहरातील नागरिकांना सांस्कृतिक विवाहयोग्य कार्यक्रम घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मंगल कार्यालय किंवा सभागृह नसल्याने नगरपरिषद च्या वतीने कोटीच्या घरात निधी खर्च करून पातुर नगर परिषद मराठी शाळा क्रमांक दोन मध्ये भव्य सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले मात्र या सभागृहाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे सभागृहाची दुरवस्था झाली असून सभागृहाच्या सगळ्या काचा खिडक्या फोडण्यात आल्या असून आत मधील विद्युत उपकरणे यांचीसुद्धा तोडफोड झाली आहे.

तसेच शौचालय मुतारी यामध्ये सुद्धा घाण पसरली असून त्याच्या साहित्याचीही तोडफोड झाली आहे तर सांस्कृतिक सभागृहामध्ये आणि बाहेरील बाजूस घाण पसरली असून त्या घाणीमुळे या सांस्कृतिक सभागृहामध्ये विवाहयोग्य कार्यक्रम करणाऱ्या वर वधू आणि त्यांचे नातेवाईकाना नाहक त्रास भोगावा लागतअसल्याची चर्चा होत आहे.

या सांस्कृतिक सभागृहांमध्ये विवाह कार्यक्रम घेण्यासाठी 10,000 हजार रुपये भाडे आकारणी केले जाते मात्र त्या दहा हजार रुपयांच्या बदल्यांमध्ये पिण्याचे पाणी नाही ,वापराचे पाणी नाही, विद्युत नाही आत मध्ये जिकडेतिकडे अन्नाचे अवशेष पसरले आहे, त्यामुळे सांस्कृतिक सभागृहचे अतोनात नुकसान झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सांस्कृतिक सभागृहामध्ये स्वच्छतेची गरज असून पिण्याचे पाणी वापराचे पाणी आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शहरातील गोरगरीब नागरिक ज्यांच्याकडे सांस्कृतिक विवाहयोग्य कार्यक्रम करण्यासाठी जागा नाही घर नाही अशा लोकांना सांस्कृतिक सभागृह हाच विकल्प असून त्या ठिकाणी असलेली घाण दूर करावी खिडक्याचे काच बसवावे तसेच आत मधील विद्युत उपकरणे शौचालय मुतारी यांचे सुद्धा दुरुस्ती करण्याची मागणी नागरिका मधून होत आहे.पातुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही.