अकोला

पत्रकार अजय प्रभे व्यसनमुक्ती समितीच्या सदस्यपदी जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्त 

मूर्तिजापूर : सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मूर्तिजापूर तालुकास्तरीय व्यसनमुक्ती समितीच्या अशासकीय सदस्यपदी येथील पत्रकार अजय प्रभे यांची जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नियुक्ती केली असून निवासी नायब तहसीलदार सदस्य सचिव असणारी ही समिती शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची तालुक्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहे. यावेळी आपल्या नियुक्तीचे श्रेय पत्रकार अजय प्रभे यांनी आमदार हरीश पिंपळे यांना दिले.