नागपूर

पक्ष विरोधी कारवाया केल्याने आशिष देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार!

नागपूर१७ऑक्टोबर:-नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकित भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष रणजित देशमुख यांचे सुपूत्र डॉ आशीष देशमुख यांच्यावर पक्षातून बडतर्फ करण्याची टांगती तलवार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.प्राप्त माहितीनुसार डॉ आशिष देशमुख आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री  केदार यांच्या माधील वाद आणखी वाढत असतानांंच,आशिष देशमुख यांनी नागपूर जिल्हा बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणून,पक्षाअंतर्गत नाराजी ओढवून घेतली आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला होता, त्यावरून पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी, देशमुख यांची लेखी तक्रार, पक्षश्रेष्ठी केल्यामुळे, त्या तक्रारीची दखल घेत, काँग्रेसचे विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांनी नागपूर मध्ये प्रत्यक्ष येऊन, देशमुख यांना समज दिली होती,त्याचा परिणाम झाला नसल्याने, नानापटोले यांच्या निर्देशानुसार आशिष देशमुख यांना नोटीस बजावली असून,एकाआठवड्यात नोटिसचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर, त्यांच्यावर पक्षातुन बडतर्फ कारण्यात येईल, असे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिलेल्या नोटीस मध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.