मुंबई दि.20 – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए मध्ये यावे. पंतप्रधान सर्वांचा सन्मान करतात असे निमंत्रण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी कॅप्टन अमारीदर सिंग यांना दिले आहे.काल पंजाबच्या राज्यपाल यांच्या कडे राजीनामा सोपवला. आज काँग्रेस पक्षाने त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री चारणजीतसिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.पंजाबच्या राजकारणाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क यांना उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी अमरिंदरसिंग यांना एनडीए मध्ये सामील व्हावे, असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सन्मान मिळतो असे ना रामदास आठवले यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.