विदर्भ

नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या वतीने७५वा स्वतंत्र दिवस साजरा

अकोला प्रतिनिधी:-१६ऑगस्ट,नारी शक्ती फाउंडेशन च्या वतीने७५वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.  नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या अकोट फाइल स्थित कार्यलयाच्या संस्थापक अध्यक्षा कु. सुमैया अली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय तिरंगा झेंड्याला  सलामी दिली,यावेळी राष्ट्रीय गीताचे गायन  करणयात आले, या वेळी कु. सुमैया अली यांनी स्वतंत्रता दिवस पर आपले मनोगत व्यक्त केले.   या वेळी नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या महिला तथा पुरुष मोठ्या संख्येने  उपस्थित होते 15 ऑगस्टरोजी पासून देश भक्तिचे गीताने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. ह उपस्थित सर्वमान्यवरांना अल्प उपहार आणि मिठाई चे वितरण करण्यात आले कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्व महिला वर्गात स्वतंत्र दिवसच्या पार्श्वभूमीवर   आनंदित वातावरण पाहला मिळाले. येणाऱ्या काळात महिला वर्ग सुदधा देशहितात मोठे मोठे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास नारी शक्ति सेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा कु. सुमैया अली यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अंगणवाड़ी सेविका चित्रा हांडे, भूतपूर्व पुलिस महिला गंगा शिंदे , इजहार उल्लाह बेग, सैमोद्दीन जागीरदार ,अफजल खान, राधिका पाटिल, राज भगत ,पूनम चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.