नवी दिल्ली५सप्टेंबर:- देशभरात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५सप्टेंबर जन्मदिवस असून,हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो,शिक्षण क्षेत्रात महत्त्व पूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांचा या दिवशी सन्मान केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर देशातील ४४शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्व पूर्ण योगदान आणि कामगिरी बजावली त्यासाठी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, व्हिडीओ कॉन्स्फरस द्वारे या वर्षीच्या शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमच्या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक आदर्श आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली पण आजही त्यांची ओळख ही एक शिक्षक म्हणूनच आहे. आज मला देशातील शिक्षकांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे.” राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या कार्याचाही उल्लेख केला.आपल्या देशातील शिक्षण हे नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यं रुजवणारं असावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. शिक्षकांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा आणि एक आदर्श भारत घडवण्यात हातभार लावावा असंही आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड ही सुरुवातीला जिल्हास्तरीय पातळीवरून सुरु होते, त्यानंतर ती राज्यस्तरीय पातळीवर केली जाते. शेवटी सर्व राज्यांतून आलेल्या शिफारसीवरून देश पातळीवर या शिक्षक पुरस्काराच्या शिक्षकांची निवडअसते.