चारही प्राध्यापक भाजपचे आमदार माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या शिक्षण संस्थेतील!
बीड ४ऑगस्ट:-बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुई(नालाखोल)येथील शेख महम्मद बाबा दर्ग्याची१०२ एकर इनामी जमीन, भाजपचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या चार प्राध्यापकांनी सरपंचाली हाताशी धरून बळकावल्याची घटना उघडकीस आली आहे.त्यावरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोन प्राध्यापकांसह चार जणांना अटक करण्यात आले आहे.तर दोन शिक्षक फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. थोडक्यात माहिती अशी आहे की,बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या रुई नालकोल येथील, शेख महंमबाबा यांची १०२ एकर इनामी जमीन, खोटे दस्तावेज तयार करून बळकावल्या प्रकरणी, चार व्यक्ती व खोटी साक्ष दिलेले दोन जण अश्या सहा व्यक्तींवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी २ प्राध्यापक, १ सरपंच वआणखी१ अशा व्यक्तींना, मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्याध्यापक व एक प्राध्यापक पोलिसांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याऐवजी, चक्क इनामी जमिनी प्राध्यापक बळकायला लागल्याने, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या खोट्या दस्त ऐवजावर साक्षीदार म्हणून संजय भाऊसाहेब नालकोल, सरपंच-रुई नालकोल ता.आष्टी व शरद नानाभाऊ पवार, रा.रुई नालकोल ता.आष्टी, यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. तर, अजिनाथ बोडखे, गोपीनाथ बोडखे, मुस्ताक शेख हे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.तर, सुरेश बोडखे हे आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक आहेत. हे माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या संस्थेतील सर्व कर्मचारी असल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात जवळपास २७ हजार एकर इनामी जमीन आहे. मात्र मस्जिद, दर्गा, मंदिर व इतर देवस्थानच्या इनामी जमिनीचे बनावट दस्त ऐवज तयार करून, खरेदी विक्री सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील इनामी जमिनी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.