मूर्तिजापूर : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या विनोदाच्या माध्यमातून वास्तव अधोरेखित करणार्या छोट्या पडद्यावरील लोकप्रीय मालिकेच्या सेट वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ‘सुल्टा’ केला.
या मालिकेतील कलावंत रवीकुमार राठी यांनी मुंबईत मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नुकतीच घेतली भेट. या मालिकेत आपापली भूमिका बजावणारे जेठालाल, आत्माराम भिडे, तारक मेहता, टप्पू, पत्रकार पोपटलाल, गोगी, पिंकू, बाघा, नट्टू काका, सोनू, अब्दुल यांच्याशी संवाद साधला.
त्यावेळी घडले असे की, रवि राठी यांचे मूर्तिजापूरकरांच्या वतीने स्वागत स्विकारतांना या सर्व कलावंतांनी आपल्या खर्या नावांसह परिचय दिला आणि ‘….उल्टा चष्मा”…सुल्टा’ झाला.
कलावंतांशी संवाद साधताना, त्यांना मालिकेच्या एका भागाचे चित्रीकरण करतांना किती कष्ट पडतात, याची प्रचिती रविकुमार राठींना आली.यावेळी त्यांच्या समवेत पत्नी ज्योती राठी, मुलगा हार्दिक राठी,मुलगी रिया राठींची उपस्थिती होती.