अकोला

‘डॉ.अशोक शिरसाट व्यक्ती आणि वाङ्ममय ‘ या आस्वादक समीक्षा ग्रंथाची ‘तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड

अकोला: अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शिरसाट यांच्या विविध साहित्यकृतींवर कोल्हापूर येथील जेष्ठ कादंबरीकार , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, महाराष्ट्र शासनाचे साहित्य पुरस्काराने सन्मानित व्यक्तीमत्व डॉ.श्रीकांत पाटील यांनी वाङ्ममयीन संशोधन ,सौंदर्यशास्त्र , ललित कला , आस्वादक लेखन अशा विविधांगी दृष्टीकोनातून डॉ . अशोक शिरसाट यांच्या कसदार साहित्यकृतींवर आस्वादक समीक्षा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे.

सदर ग्रंथास मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने देण्यांत येणार्‍या ‘तापी- पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे. सदर राज्यस्तरीय पुरस्कार येत्या ३ मे २०२३ रोजी मंगळवेढा जि. सोलापूर येथे संपन्न होणार्‍या दुसर्‍या राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यांत येईल, असे झूम मिटींग द्वारे उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.