water-problem
अकोला

जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत फेब्रुवारीमध्ये मुबलक साठा

अकोला: जिल्ह्यातील २४ लघु प्रकल्पांमध्ये फेब्रुवारी अखेरीस ३० ते ८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लघु प्रकल्प परिसरातील गावांमधील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या संदर्भात मिळालेल्यामाहितीनुसार जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि २४ लघु प्रकल्प आहेत.

जलप्रकल्पामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.त्यामुळे पावसाळा सुरु झाला की जल प्रकल्पातील साठ्याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागलेले असते. यावर्षी नोव्हेंबर अखेर पर्यंत पाऊस झाल्याने मोठे, मध्यम आणि लघु सर्वच प्रकल्प ओसंडून वाहिले होते.

लघु प्रकल्पाची साठवण क्षमता अत्यंत कमा असते. त्यामुळे उन्हाळ्याला प्रारंभ झाला की लघु प्रकल्पातील जलसाठ्यात घट होते. मात्र नोव्हेंबर पर्यंत पाऊस झाल्याने त्यामुळे आता फेब्रुवारी अखेरीसही प्रकल्पात जलसाठा आहे.

अकोट तालुक्यातील शहापूर बृहत प्रकल्पात ७१.३३ टक्के, बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पात ९२ टक्के, पातूर लघु प्रकल्पात ७९.७६ टक्के, अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पात ७१.९० टक्के तर म्ूर्तिजापूर तालुक्यातील वाई प्रकल्पात ६३.४५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.