Nashik Run 2023
महाराष्ट्र

गुलाबी थंडीत धावले हजारो नाशिककर

गरजूंच्या मदतीसाठी अभिनव आयोजन

नाशिक, 18 फेब्रुवारी : समाजातील गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी शनिवारी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एकवीसाव्या नाशिक-रनचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक महात्मा नगर क्रीडांगणावर हजारो नाशिककरानी गुलाबी थंडीत आपला सहभाग नोंदविला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशिमा मित्तल जिल्हा परिषद मुख्याधिकारी, नाशिक रन चे अध्यक्ष एच एस बॅनर्जी, उपाध्यक्ष आर आर भुयांन , सचिव अनिल दैठणकर खजिनदार राजाराम कासार, विश्वस्थ ए अनंथरामन, प्रबल रे, मुकुंद भट, अशोक पाटील,श्रीकांत चव्हाण, नाशिक रन चे माजी विश्वस्त श्री सुधीर येवलेकर, उत्तम राठोड इत्यादींनी उपस्थिती नोंदवली.

नाशिक-रन चे संस्थापक व बॉश इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य व नाशिक रन चे संस्थापक आणि टीडीके चे माजी व्यस्थपकीय संचालक नटराजन बालाकृष्णन यांनी ऑनलाईन पद्धतीने नाशिक रन मध्ये सहभागी झाले होते.

यावेळी डिजिटल स्क्रीन वापरण्यात आल्यामुळे नाशिक रन चा हेतू व राबविण्यात आलेले प्रकल्प व विविध उपक्रमांची माहितीचे सादरीकरण करण्यात आले होते त्या मुळे या वेळच्या नाशिक रन चे मुख्य आकर्षण डिजिटल स्क्रीन ठरले होते.