क्राईम बुलढाणा

गिप्ट देण्याचा बहाणा करीत, जिजाजीचा सालीवर बलात्कार! बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथी घटना

बुलढाणा १३सप्टेंबर:-बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात गिफ़्ट देण्याचा बहाणाने जावयाने, सालीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेला १महिन्याचा कालावधी होण्यास काहीच दिवसाचा अवधी शिल्लक असून, पोलिसांनी अजूनही आरोपी जावयाला अटक न केल्याने बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, चिखली शहरात येत असलेल्या, माळीपूरा भागात रहिवासी असलेल्या१६वर्षीय अल्पवयीन मुलीचा२०ऑगस्ट रोजी वाढदिवस होता.वाढदिवसाच्या निमित्ताने पीडित अल्पवयीन मुलीचा जावई चिखलीला आला, त्यानंतर सासरवाडीत जाऊन मेहुणीला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला भेट वस्तू घेऊन देतो, असे म्हणत तिला दुचाकीवर बसवून, दुकानात घेऊन गेला. त्यानंतर तीला घरी न पोहचवीता, दुचाकी जालना कडे जाणाऱ्या दिशेने वाळवून, तिला तो मेहकर फाट्यावर घेऊन गेला. जावयाला मेहुनीसोबत दुष्कर्म करायचे असल्याने, त्याने आगोदर योजना आखली होती,या योजनेनुसार त्याने कार मेहकर फाट्यावर त्याच्या मर्जीतील इसमाला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार कार मेहकर फाट्यावर नियोजित ठिकाणी हजर होती.दरम्यान जावई त्या अल्पवयीन मुलीला घेऊन मेहकर फाट्यावर पोहचला,त्याठिकाणी पोहचल्यावर अल्पवयीन मुलीला आपल्या सोबत काहीतरी चुकीचे घडण्याची चाहूल लागली,परंतु तिने काही करण्याच्या आतच,जावयाने तिचे तोंड दाबून तिला गाडीत टाकले,आणि गाडी सुसाट वेगाने जालन्याचे दिशेने काढली.पुढे काही अंतरावर गेल्यावर एका निर्जळठिकाणी थांबवून गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. क्रूरकर्मी जावई एवढ्यावसच न थांबता त्याने गाडी जालना येथे घेऊन, एका लॉजवर त्या मुलीला घेऊन गेला. परंतु लॉज मालकाला संपूर्ण परिस्थिती संशयास्पद वाटल्याने, त्याला रूम देण्यास नकार दिला.तेव्हा जावायने पुन्हा गाडी चिखलीच्या दिशेने वळवून, पुन्हा गाडीतच त्या मुलीवर बलात्कार केला. आणि शेवटी त्याने पीडितेला तिच्या घराजवळ सोडुन निघून गेला. घरी आल्यावर आईवडिलांनी उशिरा येण्याचे कारण विचारल्यावर, ती तरुणी ओक्साबोक्शी रडायला लागली, आणि तिच्या सोबत घडलेली संपूर्ण कहाणी घरच्यांना सांगितली, त्यावरून मुलीला सोबत घेऊन,चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,पोलिसांनी नमूद जावया विरोधात ३६३,३६६(अ)३७६,१०९,१०२,आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण अत्याचार पासून संरक्षण कायद्याचे कलम,४,८,१२नुसार पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु गुन्हा होऊन१ महिन्याचा कालावधी होण्यास ४ते५दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे, तरी सुद्धा आरोपाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. संपूर्ण राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झाली असून, अशा वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे एकंदरीत चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. चिखली येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारच्या घटनतेत पोलिसांनी ठेवलेली गुप्तता यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही राजकिय पक्षाने, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल आवाज न उठविल्याने, आश्चर्य व्यक्त केला जात आहे. बुलढाणा पोलीस त्या नाराधाम जावयाला आणि त्याची मदत करणाऱ्या कार चालकाच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे