अकोला: शासनाने जनतेचे रेशन बंद करण्याचा डाव मांडला असून प्रशासनातर्फे परिपत्रक काढुन त्याद्वारे जनतेचा रेशन धान्याचा हक्क काढुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात मंगळवारी जिल्हा व महानगर काँग्रेसच्या वतीने महानगरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात शेकडो महिला पुरुष नागरिक सहभागी होऊन त्यांनी या मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारच्या जनविरोधी निर्णयाचा निषेध केला. यावेळी रेशन आमचे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे व देश सामान्य जनतेचा नाही कुणाच्या मालकीचा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.हा मोर्चा स्वराज्य भवन येथून प्रारंभ होऊन त्याचे समापन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. कॉंग्रेस नेते शाम उमाळकर यांच्या नेतृत्वात व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर
यांनी अध्यक्ष म्हणुन या अभियानाची धुरा सांभाळली. या जनआंदोलनात संयोजक म्हणुन प्रमुख जबाबदारी कॉंग्रेस नेते विवेक पारसकर यांनी सांभाळली. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, काँग्रेस नेते विवेक पारसकर, महेश गणगणे व काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे यांनी रेशन बंद विरोधी आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. या जनमोर्चाच्या यशस्वीतेसाठी साजिदखान पठाण, विजय देशमुख, तशवर पटेल, अतुल अमानकर, अफरोझ खान पठाण, अन्नपूर्णा पाटील, कैलाश पाटील, अंकुश देशमुख, जितेंद्र गुल्हाने, अश्रफ पटेल, रमेश बेटकर, विशाल इंगळे, राजेश नळकांडे, अतुल राहणे, सागर गावडे, फजलु भाई, प्रकाश वाकोडे, बालापूर ता. युवक काँग्रेस उपाध्यक्ष भूषण डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.