नवी दिल्ली१५ऑगस्ट:- केंद्रीय राखीव पोलीस दलाने, देशभरातील वेगवेगळ्या सीएपीएफ रुग्णालयात पॅरामेडिकलस्टाफच्या विविध पदासाठी जम्बो भरती केल्याचे जाहीर केलेआहे.पॅरामेडिकल स्टाफमध्ये२४३९ वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.त्यासाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी,आवश्यक माहिती मिळविण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(crpf.gov.in)या अधिकृत साईटवर जाऊन,अधिक माहिती घेऊ शकतात,सी.आर.पीने पॅरा मेडिकल मध्ये करियर करणाऱ्यांंसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे: केंद्रीय राखीव पोलीस दलाने जारी केलेल्या या रिक्त जागेत (CRPF भर्ती 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल.नमूद पदांसाठी उमेदवार १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या मुलाखतीसाठी थेट हजर राहू शकतात. अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांचे अर्ज स्वरूप (CRPF भर्ती २०२१) वर पाहू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) कंत्राटी तत्त्वावर विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
मुलाखतीद्वारे निवड
पात्र आणि इच्छुक उमेदवार सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या दिनांकाला आणि वेळेला मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रे त्यांच्या फोटोकॉपीसह (सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ.) सोबत ठेवणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांना सर्व माहितीसह अर्ज साध्या कागदावर लिहून सादर करावा लागेल. अर्ज केलेल्या पदाचे नाव अर्जात भरावे लागेल. अर्जासोबत अलीकडील 3 फोटो सोबत ठेवावे लागतील.
पदांचा तपशील
आसाम रायफल्स (AR) – 156
सीमा सुरक्षा दल (BSF)- 365
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) – 1537
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)- 130
सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) – 251
पात्रता
सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र सेना निवृत्त उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता.
निवड प्रक्रिया
केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नसून थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अशा परिस्थितीत, जे उमेदवार त्यात अर्ज करतील त्यांना १३सप्टेंबर ते १५सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत उपस्थित राहावे लागेल