अकोला : स्त्री – पुरुषात कुठलाही भेदभाव नसून कर्माच्या श्रेष्ठतेवर त्यांच्या आदर्शातून सामाजिक उत्कर्षाची दिशा निर्देशित होत असते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. स्थानिक डाबकी रोड येथील मास्टर पॉवर जिम आणि अनंत-नंदाई सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरोरा बोलत होत्या.
यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रेखा पाटील, ममता डिक्कर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला हजारो महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. दरवर्षी मास्टर पॉवर जिम आणि अनंत नंदाई सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त एखाद्या सणाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून वसंत हंकारे यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक घटनांचे दाखले दिले. यावेळी डॉ. रेखा ा पाटील यांनी स्त्री आरोग्यासाठी दैनिक जीवनातील आजच्या स्पर्धा युगातील दक्षता आणि मानसिक शक्ती कायम ठेवण्यासाठी मूलमंत्र विषयी संदेश तसेच स्त्रिया यशस्वीतेत एक पुरुष सुद्धा स्त्रीच्या पाठीशी उभा असतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन आरजे दिव्या, पूनम सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन मनोज पाटील यांनी केले.