अकोला प्रतिनिधी:-१४ ऑगस्ट रोजी अकोट पोलीस ठाण्यात कथित पत्रकार मोहन पांडेवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याला लाखांच्या रकमेत खडणी मागितल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पांडे याच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यात मोहन पांडे तुरुंगाची हवा खात असतांनाच,त्याच्या विरोधात आणखी एक खंडणी मागण्याची तक्रार आल्याने,पुन्हा एका गुन्ह्याची भर पांडेच्या खात्यात पडली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष रामकृष्ण शेंडे वय४५ वर्षे,रा.कॅनरा बँक कॉलनी अकोट,यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संतोष रामकृष्ण शेंडे यांचा गौण खनिजाचा व्यवसाय आहे, मोहन पांडे माझ्या व्यवसाय संबंधी तहसील कार्यालयात माहितीचे अधिकार दाखल करून नेहमी पैशाची मागणी करतो व विरोधात खोट्या बातम्या प्रकाशित करून तसेच तक्रारीकरून मला सतत त्रास देतो.पुढे त्यांनी त्यांच्या तक्रारीत सुनील धुळे यांच्या माध्यमातून एका आदिवासी महिलेची जमीन ताब्यात घेऊन अवैध पणे गौण खनिजाचे उतखन केले आहे.हे सर्व थांबवायचे असेल तर मला एक लाख रुपये द्यावे लागतील अशा प्रकारचा निरोप तक्रार दार यांचा भाचा व मित्राजवळ यांच्याकडे केला,त्यावरून अमोल आणि रोशन नामक व्यक्तीच्या माध्यमातून६०हजार रुपयांची रक्कम पांडे याला दिली,उर्वरित४०हजार रुपये दिले नसल्याने, मोहन पांडे याने जीवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची तक्रार संतोष शेंडे यांनी अकोट पोलीस ठाण्यात दाखल केल्यावरून मोहन पांडे याच्या विरोधात अकोट शहर पोलीस ठाण्यात कलम३८४,३८६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.नमूद गुन्ह्यात मोहन पांडेला जेल मधून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर करीत आहेत