वारंवार तक्रारी करुन सुद्धा कारवाई नाही !
अकोला : इंदिरा नगर अकोट फैल प्रभाग क्र. १ अंतर्गत येणार्या मिल्लत कॉलनी परिसरात तत्कालीन अकोला नगर परिषद प्रशासनाने इंदिर नगर व संपूर्ण आजुबाजुच्या परिसरातील पावसाळ्यात साचणार्या घाण सांडपाण्याचा योग्यप्रकारे निचरा होण्याकरिता १० ते १२ फुटाचा कच्चा नाला खोदून तयार केलेल्या नाल्यावरील अवैधरित्या नागरीकांनी केलेले अतिक्रमीत पक्के बांधकाम हटविणेबाबत सैय्यद कदीर अय्याज व अन्य त्रस्त नागरीकांनी दिलेल्या प्रलंबित तक्रारीवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करुन कर्तव्य बजावण्यास कसुर करणार्या उत्तर झोन क्षेत्रीय कार्यालय अधिकारी श्री विठ्ठल देवकते यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तुणुक) अधिनियम १९७९ अंतर्गत कार्यवाही करणेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक महासचिव तथा ज्येष्ठ उर्दू कवी सैय्यद कदीर अय्याज सैय्यद सरदार यांनी लोकशाही दिनात तक्रार दिली असून इंदिरा नगरसह आजुबाजुच्या परिसरात राहणार्या निरपराध नागरिकांच्या गंभीर समस्यांचे निवारण करण्याचे दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सैय्यद कदीर अय्याज, शेख तस्लीम शेख गनी, सैय्यद कलीम व इतर त्रस्त नागरिकांनी दि. १७/१०/२०२२ रोजी मा. आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी महोदया यांना वरील मोठ्या नाल्याचे जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करुन काही पैसेवाल्या नागरीकांनी पैशाचे जोरावर पक्के केलेले बांधकाम हटविण्याबाबत सादर केलेल्या विनंती अर्जावर उत्तर झोन अधिकारी विठ्ठल देवकते यांनी नियमानुसार कार्यवाही करण्यास टाळाटाळ करुन अतिक्रमण धारकांना एक प्रकारे पाठबळ दिल्यामुळे तसेच स्थानिक नगरसेवकांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढल्याने अतिक्रमण हटविण्या ऐवजी त्या ठिकाणी ? नविन पक्के बांधकाम करण्याचा सपाटा सुरु झाल्याने सैय्यद कदीर यांनी या बाबत देवकते यांची भेट घेण्याकरित गेले असता देवकते यांनी सैय्यद कदीर यांना सहकार्य न करता उलट त्यांना अपमानीत केले.
त्यामुळे अपमानीत झालेल्या सैय्यद कदीर अय्याज यांनी इंदिरा नगर येथील नागरिकांना उत्तर झोन कार्यालयातून न्याय मिळत नसून उलट तक्रारकर्त्यांनाच अवमानीत करण्यात येत असल्याने सैय्यद कदीर अय्याज यांनी माननीय जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दि. ६/३/२०२३ रोजी आयोजित लोकशाही दिनात उत्तर झोन कार्यालय अधिकारी विठ्ठल देवकते यांचे विरुद्ध सदर प्रलंबित तक्रारी प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) अधिनियम १९७९ अन्वये कार्यवाही करणेबाबत तक्रारीत नमुद केले आहे. जिल्हाधिकारी यावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.