पातुर : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून विजा मेघगर्जने सह वादळी पावसाने हजेरी लावली आहे पातुर तालुक्यात काही ठिकाणी जोरदार गारपिट होऊन हाता तोंडाशी आलेल्या रब्बी पिकासह काही फळ पिकांचे नुकसान करणे सुरूच ठेवले आहे.
प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार ३७४ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना अस्मानी व सुलतानी संकटांपासून उसंत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पातुर तालुक्यात शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान वादळी वार्यासह तुफान पाऊस व गारपीटीने परिसराला जोडपून काढले असून तब्बल एक तास चाललेल्या वादळी वार्यासह पाऊस व गारपिटीने तालुक्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान केले आहे पातुर तालुक्यातील चार गावातील अंदाजे ३७४ हेक्टर शेती क्षेत्र या पाऊस व गारपिटीने बाधित झाले तर जाम,पाचरन, चोंढी,चारमोडी नवेगाव,उमरा, पांगरा, सावरगाव,आडगाव, उमरवाडी मळसूर यासह अनेक गावांमध्ये शेतकर्यांचे फार मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
पातुर तालुक्यात कोठारी खुर्द येथे ८२ हेक्टर कोठारी बुद्रुक ८५ हेक्टर, आस्टूल १०५ हेक्टर व पास्टूल येथे १०२ हेक्टर असे १७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यातील गहू हरभरा मूग ज्वारी कांदा भुईमूग संत्रा मोसंबी लिंबू टरबूज पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली यामध्ये तालुक्यातील कोठारी,आश्टुल पाश्टुल,खानापूर येथे काल झालेल्या गारपीट भागाची शेतीची पाहणी केली. त्यावेळी पातूरचे तहसीलदार दीपक बाजड , कृषी अधिकारी, ग्रामसेवक तलाठी , उपजिल्हाप्रमुख योगेश भाऊ वानखडे, देवलाल डाखोरे शिवसेनेचे शहर प्रमुख (ठाकरे गट) निरंजन बंड , परसरामजी उंबरकार, सुनील गाडगे, शंकर देशमुख, अनिल निमकंडे, दीपक देवकर, अंबादास देवकर, विशाल गोतरकार, गणेश घुगे, गोविंदा, त्या भागातील शेतकरी बांधव व शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात गारपिटीसह वादळी वार्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून विविध पिके जमीनदोस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्?टरी एक लाख रुपये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करेल आ. नितीन देशमुख बाळापूर विधानसभा मतदारसंघ