अकोला

आलेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी

पातूर : तालुक्यातील आलेगाव येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे वतीने शिवजयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

त्यामधे तरुणांसह, ज्येष्ठ,महिला, व बालकांसह उत्साह दिसून येत होता आलेगाव येथे तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होत झाला त्यानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने दिनांक १७/२/२००२३ रोजी भव्य मोटरसायकल शिवजन्मोत्सव जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामधे तरुणांसह, बालकांनी, ज्येष्ठ मंडळीनी उत्स्पुर्त सहभाग घेतला यावेळी समितीने केलेल्या नियोजनाची गावकरी मंडळीनी अभिनंदन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन दिवसीय कार्यक्रमा मध्ये दि १८/२/२०२३ रोजी किल्ले शिवनेरी ते आलेगाव असे ५०० किमी चे अंतर पार करत आलेगाव येथे शिवज्योत आणण्यात आली आणि सर्व गावातून शिवज्योत आणि शिवभक्त यांनी प्रदक्षिणा घालून संस्कृती, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला गावातील सर्व गावकर्‍यांनी या शिवज्योत चे सहर्ष स्वागत केले.

त्यामधे चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सुध्दा सक्रिय सहभाग नोदवला यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सभासदांचे व शिवभक्तांचे उत्साहपूर्ण शांततेसाठी अभिनंदन केले.

तसेच १९/२/२०२३ रोजी शिवजन्मो उत्सवा निमीत्त गावामधून ग्रामस्वच्छता जनजागृती फेरीचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आलेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. सकाळी संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेसह ग्रामस्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली होती त्यामधे ग्रामस्वच्छता करत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला च्या गजरात स्वछते बद्दल जनजागृति केली यावेळी तरूनांसह बालकांचा उत्साह दिसून येत होता सायंकाळी शिवजयतीनिमित्त भव्य ढोल ताशा पथकासह, रथ, देखावे, महापुरुषांच्या वेशभूषेत बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी चार ट्रॅक्टर मध्ये महापुरुषांच्या वेशभूषेत मुले होती, घोडे, पालखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत बालकानी लक्ष वेधले. गावामध्ये ठीक ठिकाणी शिवपूजन करण्यात आले होते तसेच शिवभक्तांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, खिचडीची, शरबताची, चहाची व्यवस्था मिरवणूक मार्गावर करण्यात आली होती.

अश्या प्रकारे आलेगाव मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य स्वरूपाची शिवजयंतीचे नियोजन यावर्षी करण्यात आले होते त्यामधे सर्व तरुणांनी खूप मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी पार पडला आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे व त्यांचे सहकारी पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी समस्त गावकरी मंडळीनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे भरभरून कौतुक केले.