अकोला: रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे.हे ब्रीद घेऊन सेवारत असणारे आयकॉन हॉस्पिटल ग्रामीण व शहरी परिसरात अनेक वैद्यकीय शिबीरे आयोजित करून समाजात सुदृढ वातावरणाची निर्मित करीत आहे.
याच संदर्भात आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने स्थानीय मोठ्या उमरीतील चाळीस क्वार्टर परिसरातील हनुमान मंदिर प्रांगणात रविवारी सम्पन्न झालेल्या भव्य नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात नेत्रतज्ञ डॉ नेहा मंत्री यांनी रुग्ण तपासणी करून गरजूंना मोफत चष्मे वितरित केले.
शिबिरातील मोतिबिंदू असणार्या रुग्णांची शस्त्रक्रिया हॉस्पिटल मध्ये लवकरच करण्यात येणार आहे.शिबिर प्रारंभ आयकॉन हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ के के अग्रवाल, एमडी डॉ संतोषकुमार सोमाणी यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक आरोग्य संजीवनी योजनेच्या कार्ड वितरणा ने करण्यात आला.शिबिरात हॉस्पिटलचे सीईओ डॉ रामधन शिंदे यांनी रूग्णांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.डॉ के के अग्रवाल यांनी यावेळी हॉस्पिटलच्या रचनात्मक सेवाकार्यची माहिती देत या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या एकदिवसीय नेत्र शिबिराच्या सफलतेसाठी आयकॉन हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी अंजनेय पार्डीकर, संजय साखरे स्मिता मरकुटे, सचिन टिकार, नितीन पाटील,संत गजानन महाराज मंदिराचे सुधीर गावंडे, प्रवीण बडोदे, भास्कर शेगोकर, डॉ सागर बोरसे, मदन बिहाडे, अविनाश येवले, विजय कुचर, धामणकर, मोहोड गुरुजी, ज्ञानेश्वर कटाले,कमलेश मानकर, रमेश काळे समेत आयकॉन हॉस्पिटल व गजानन मंदिर संस्थानच्या पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.