क्राईम

आगीखेड येथे चक्क गांजाची शेती,विशेष पथकाच्या कार्यवाहीत 3 किलो गांजा जप्त ; 2 आरोपीस अटक

 

पातूर२७नोव्हेंबर : तालुक्यातील आगीखेड शेतशिवारात एका शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली असता पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून कारवाई केली.
पातूर तालुक्यातील आगीखेड शेतशिवारातील एका शेतात गांजाची लागवड व गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता सदर ठिकाणी छापा मारून शेतात लावलेली मोठी 6 गांजाची झाडे व घरात लपविलेला 3 किलो गांजा अंदाजे किंमत 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शेख शहजाद शेख शब्बीर रा.पातूर व देवगन संभुजी अवचार रा.आगीखेड यांना अटक करून पातूर पोलिसांत NDPS Act कलम 20 B नुसार गुन्हा नोंदविला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या विशेष पथकाने केली.