stressfree-camp
अकोला

आगर प्राथमिक आरोग्य केंद्र तणावमुक्त शिबिर

अकोला: आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला यांच्या अंतर्गत आगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २० फेब्रुवारी रोजी तणाव मुक्त शिबिर घेण्यात आले.

शिबिरात आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त कसे रहावे, मानसिक आजारावर मोफत समुपदेशन अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व तपासणी केली गेली. शिबिरामध्ये तपासणी व मार्गदर्शन डॉ. चांडक शल्य चिकित्सक अकोला यांनी केले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. खान, आरोग्य अधिकारी डॉ. मेघना वानखडे, आरोग्य अधिकारी डॉ. अझमद उल्ला, आरोग्य अधिकारी डॉ. पूर्वा पाटील सुद्धा हजर होते. यावेळी सरपंच निशा सिरसाट, उपसरपंच सुशिला खोले कार्यक्रमाला उपस्थित होते.

शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या बराच गावातील गावकर्‍यांनी यांच्या लाभ घेतला.या शिबिरामध्ये गावातील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, आशा, आरोग्य कर्मचारी, परिचर, सफाई कामगार सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.