vanchit-bahujan-yuva-aghadi
अकोला

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर विजयी होईपर्यंत सत्कार न स्विकारण्याचा वंचित बहुजन युवा आघाडीचा निर्धार

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये विजयी होईपर्यंत युवा आघाडी कुठलाही सत्कार स्विकार नसल्याचा निर्धार वंचित बहुजन युवा आघाडीच्या नवनियुक्त कार्यकारिणीने व्यक्त केला. शनिवारी (ता.२५) स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा नवनियुक्त कार्यकारिणीची परिचय बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे हे होते तर वंचित आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जि.प. सदस्या पुष्पाताई इंगळे, महानगराध्यक्षा वंदनाताई वासनिक, पुर्व महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे, किरण बोराखडे, सुवर्णा जाधव, सचिन शिराळे, मंदा वाकोडे, छाया तायडे, राजेंद्र इंगळे, भारत निकोसे आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा परिचय, मुंबई येथे होत असलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे नियोजन आदी प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीला वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, संघटक समीर पठाण, कोषाध्यक्ष दादाराव पवार, महानगराध्यक्षा पुर्व जय तायडे, महानगराध्यक्षा पश्चिम आशिष मांगुळकर, महानगर महासचिव कुणाल मेश्राम, रितेश यादव यांच्यासह युवा आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, मिडीया प्रमुख अ‍ॅड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अमित मोरे, नकूल काटे, अ‍ॅड. सुबोध डोंगरे, संतोष वनवे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, शुभम डहाके, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, आदित्य इंगळे, वैभव यादव, जिल्हा सदस्य संकेत कोल्हे, स्वप्निल आखरे, किशोर सुरवाडे, सुजित तेलगोटे, रेहान खान यांच्यासह मयुर सपकाळ, अमोल जामनिक, आकाश गवई, धीरज इंगळे, आकाश जंजाळ, शेखर इंगळे, रणजीत तायडे, अजय शिरसाट, अभिजीत अवचार, अक्षय डोंगरे, स्वप्निल वानखडे, रत्नपाल डोंगरे, सचिन कांबळे, आशिष गिरी, नंदकिशोर मापारी, डॉ. उमेश वानखडे, निशांत राठोड, नितीन वानखडे, ऋषिकेश खंडारे आदी वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.