जिल्हाधिकाऱ्यांनी केले रिपाईं(ए)चे नेते सचिन कोकणे यांना आश्वस्त
मूर्तिजापूर : या तालुक्यातील वडगाव येथील अवैधरित्या गौण खनिज उत्खनाबाबत गांभीर्यपूर्वक कार्यवाही न करता संबंधित कंपनीला पाठीशी घालून अभय देण्यात आल्याच्या रिपाईं (ए) चे जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यांच्या तक्रारीसंदर्भात पक्षाचे वरीष्ठ नेते सचिन कोकणे यांनी घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी २९ मार्चला वडगाव कुरुम उत्खनन संदर्भात आयोजित सुनावणीच्या वेळी पक्षाच्या वतीने दोन प्रतिनिधी उपस्थित ठेवावे, असे सांगून मूल्यांकन करून रॉयल्टी वसूल केल्या जाईल तसेच मोजणीच्या अहवालावरून जास्त उत्खनन झाले असल्यास योग्य तो दंड करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
तहसीलदारांना निवेदन देऊन अवैधरित्या खनिज उत्खननाबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली होती, परंतु ही बाब गांभीर्याने न घेता अवैधरित्या खनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला पाठीशी घालुन अभय देण्यात आले. तक्रारीनंतर सुध्दा उत्खनन चालूच राहिले. तक्रारीची वेळीच दाखल घेतल्या गेली असती तर या प्रकरणाला आळा बसला असता परंतु उलटपक्षी १९/१२ /२०२२ च्या एका पत्रान्वये तक्रार निकाली काढुन प्रकरण खारीज केल्याचे तहसीलदारांनी लेखी पत्र देऊन कळविल्याचे यावेळी सचिन कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यावेळी त्यांच्या समवेत होते.
येणाऱ्या २९ मार्च ला जिल्हाधिकारी यांच्याकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय अध्यक्ष मान. दिपकभाऊ निकाळजे व बाळासाहेब पवार प्रदेश कार्याध्यक्ष यांचे मार्गदर्शनात संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे विरोधात आंदोलन व उपोषण करण्यात येईल.
– सचिन कोकणे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
अकोला जिल्हा लोकसभा प्रभारी अध्यक्ष