क्राईम

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक*

प्रमोद कढोने

पातूर9 ऑगस्ट : शहरातील शिवनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे शहरातील रेस्ट हाऊस नजिक असलेल्या शिवनगर येथे दि.6/08/2022 दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास एक सातव्या वर्गातील मुलगी आपल्या घरासमोर खेळत असतांना शेजारीच राहणारा एक इसम दारूच्या नशेत तिथे आला व मुलीचा हात खेचून लगट करण्याचा प्रयत्न केला.अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरून मुलीने आरडाओरडा केल्याने सदर इसमाने तेथून पळ काढला.दरम्यान सायंकाळच्या सुमारास मुलीचे आईवडील कामावरून घरी परतले असता मुलीने घडलेल्या प्रकाराची आपबिती पालकांना सांगितली असता त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली.सदर फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेणे सुरू केले.दोन दिवस शोध घेतला असता काल दि.7/08/2022 रोजी संध्याकाळी उशिरा आरोपीस अटक केली.सदर आरोपीचे नाव सुधाकर डीगांबर ढेंबरे (वय अंदाजे 33 वर्ष) रा.शिवनगर, पातूर असे असून अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुधाकर ढेंबरे याच्या विरोधात अप.क्र.270/22 कलम 452,354,354 (अ), सहकलम 8,12 भादंवि पोक्सो अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय मीरा सोनुने करीत आहेत.