अकोला

अमित गजानन वरणकार याना अंतरराष्ट्रीय सन्मान

अकोला: राष्ट्रहित फाउंडेशन आणि ह्युम्युनिटी वेल्फेअर सोसायटी च्या सहकार्याने २ दिवसीय आंतरराष्ट्रीय संवाद परिषदेचे बिकानेर राजस्थान येथे आयोजन करण्यात आले होते, तसेच यामध्ये गाडगेबाबा चौक नागे ले-आऊट कौलखेड अकोला येथील अमित वरणकार, गरजुचे रक्तदाते परिवार महाराष्ट्र राज्य यांना कारगिल योद्धा नायक दीपचंद जी सर तसेच कर्नल हेलसिंग शेखावत यांच्या हस्ते ग्लोबल ह्युमिनिटी चेंज मेकर अवॉर्ड सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला बिकानेर चे आयुक्त माननीय नीरज कुमार जी तसेच कारगिल योद्धा नायक दीपचंद सरजी, कर्नल हेलसिंग मेवासिंग सरजी, सुचित्रा अहिरे उपस्थितीत होते. या ट्रेनिंग मध्ये नेत्रदान ,अंगदान ,रक्तदान तसेच मिल्क बँक याविषयी सर्व ट्रेनिंग देण्यात आले या ट्रेनिंग साठी देश तसेच विदेशातील समन्वयक उपस्थित होते.

Sinha-Hospital-Advt Akola
संपर्क 9356215876, 9011024745

रक्तदान क्षेत्रातील निःस्वार्थ कार्य साठी अमित वरणकार गरजुचे रक्तदाते परिवार व संस्था संस्थापक-अध्यक्ष हापुरस्कार स्वीकारताना माननीय बोलले की हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून गरजुचे रक्तदाते मधील सर्व पदाधिकारी, रक्तदाते ,आयोजक तसेच वेळोवेळी मदत करणार्‍या ब्लड बँक यांचा आहे अशी माहिती अमित वरणकार संस्थापक यांनी दिली.