kishori-sahane
अकोला

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या उपस्थितीत १०८ मातृशक्ती सन्मानित युवक काँग्रेसचा महिला दिन सोहळा

अकोला: जागतिक महिला दिन निमित्त प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने स्थानीय जवाहर नगर परिसरातील राजे संभाजी पार्क येथे शनिवारी मातृशक्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात मराठी चित्रपट तारका किशोरी शहाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या गौरव सोहळ्यात प्रमु पाहुणे म्हणून.आ.धीरज लिंगाडे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार,महानगर काँगेस अध्यक्ष डॉ.प्रशांत वानखडे,प्रदेश नेते डॉ.अभय पाटील,प्रदीप वखारीया, महेश गणगणे,सिद्धार्थ रूहाटीया, कपिल रावदेव,पुष्पा देशमुख,पूजा काळे,पुष्पा गुलवाडे,विभा राऊत,रेवती तवर,संगीता आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्याचा प्रारंभ गणेश वंदनेने करण्यात आला. यावेळी नारीशक्ती वर आधारित नृत्य सादर करण्यात आले.सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या विविध परिसरातील तब्बल १०८ मातृशक्तींना साडी-चोळी व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांनी या उपक्रमाची उपयुक्तता विशद करीत सन्मानित मातृशक्तींना आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सागर कावरे यांनी साकार केलेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक सागर कावरे यांनी संचालन पल्लवी पळसपगार यांनी तर आभार अंशुमन देशमुख यांनी मानलेत.