क्राईम

अट्टल मोबाईल चोरट्यास अटक!

अकोला प्रतिनिधी२९ऑगस्ट:-अकोला शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास, अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, यांच्या विशेष पथकाने२९ऑगस्ट रोजी अटक केली.शेख सद्दाम शेख कासम, वय२६ वर्षे, रा.खैरमोहम्मद प्लॉट, असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नांव आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील पोलीस स्टेशन सिटी कोतवाली आणि पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे, मोबाईल चोरीचे अपराध क्रमांक४६०/२१ आणि अपराध क्रमांक८०३/२१ असे कलम ३७९नुसार गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात चोरी गेलेले मोबाईल हे, नमूद चोरट्याने चोरी केले असल्याची गुप्त माहिती, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे विशेष पथकाच्या चमूने मोठया शिताफीने, शेख सद्दाम मोहम्मद कासम याला चौकशी साठी ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केली असता, पो. स्टे.सीटी कोतवाली आणि पो. स्टे. सिव्हिल लाईन येथे दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची शेख सद्दाम याने दिली.याशिवाय त्याने इतरही ठिकाणाहूनही ९मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे नमूद आरोपीकडून १लाख७हजार रुपयांचे ११मोबाइल जप्त करण्यात आले. त्याने आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्या का?याचा तपास विशेषतः पथक करीत आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. महेंद्र बहादुरकर ,जाकीरखान, शेख हसन,मोहम्मद नदीम,संतोष गावंडे,राज चंदेल यांनी केली.