ताज्या बातम्या देश

शाळकरी मुलाला मारहाण, सुप्रीम कोर्टाची नाराजी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका शाळकरी मुलाला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याप्रकरणातील मारहाणीत सहभागी असलेल्या मुलांचे आणि घटनेतील प्रत्यक्षदर्शींचे अद्याप समुपदेशन झालेले नाही.न्यायालयाने सांगितले की, आता खूप उशीर झाला आहे. राज्य सरकारने अद्याप काहीही केलेले नाही. हे आमच्या सूचनांचे थेट उल्लंघन आहे.
न्यायालयाने राज्य सरकारला लवकरात लवकर मुलांचे समुपदेशन करून दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ मार्च रोजी होणार आहे.गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि राज्य पोलिसांकडून तपास आणि एफआयआर नोंदवण्यात विलंब झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.तसेच न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला तपासावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाने ही घटना हलक्यात घेता येणार नाही असे म्हटले होते. शाळेतील शिक्षक मुलाच्या धर्माबाबत भाष्य करू शकतात हे उताऱ्यावरून स्पष्ट होते.इतर मुलांना मारहाण केली जात आहे, हे कसले शिक्षण म्हणायचे? असा संतप्त सवाल न्यायालयाने केला.दरम्यान, खुब्बापूर गावातील शाळेत एका शाळकरी मुलाला पाढा पाठ नव्हता म्हणून एका शिक्षिकेने दुसर्‍या मुलांकडून या मुलाला बेदम मारहाण केली होती.त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे.