ताज्या बातम्या विदर्भ

राज्यातील जलसाठा ५३ टक्केच…!

ठाणे व कोकण विभागात एक गाव व तीन वाड्यांत दोन टँकरनी पाणीपुरवठा मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता राज्याच्या इतर विभागातील ५४५ गावांत व १ हजार १६२ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू

Read more
ताज्या बातम्या विदर्भ

भूकंपाने हादरला चीन, गांसू प्रांतात १०० आणि किंघाईमध्ये ११ जणांचा मृत्यू

बीजिंग, 19 डिसेंबर :  चीनमध्ये सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे 111 जणांना जीव गमवावा लागला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरचे म्हणणे आहे की, भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोकांमध्ये घबराट पसरली. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत वायव्य चीनच्या गान्सू प्रांतात 100

Read more
ताज्या बातम्या विदर्भ

सोलार कंपनीतील स्फोटात ९ जणांचा मृत्यू

६ महिलांसह ९ जण ठार; घटनास्थळ सील; कामगारांचा आक्रोश १७ डिसेंबर नागपूर/बाजारगाव : सोलार एक्सप्लोसिव कंपनी चाकडोह ( जि. नागपूर ) येथे रविवारी सकाळी ९ वाजता झालेल्या स्फोटात ६ महिला व ३ पुरुषांसह एकूण ९ कामगारांचा मृत्यू झाला, सुदैवाने तीन लोक बचावले. या घटनेनंतर कंपनीतील कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश

Read more
Drought
पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे सावट

२७ ऑगस्ट अकोला :’सुखी असेल शेतकरी तरच समाधानी होईल जनता’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बळीराजावर आलेल्या दुष्काळाच्या सावटाने त्यावर आधारित सण-उत्सव, व्यापारी, बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन , गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे मळभ दाटले असून आतापासूनच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचं चित्र आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी होत आलेला

Read more
Ajay-Prabhe RPI Vidarbha
विदर्भ

मूर्तिजापूर : अजय प्रभेंना बढती, आरपीआय (ए) चे विदर्भ सचिव

२१ ऑगस्ट मूर्तिजापूर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षातील आजवरचे योगदान लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्ष अजय प्रभे यांना बढती देत त्यांची विदर्भ प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती केली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करणार व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.

Read more
अकोला विदर्भ

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दिड वर्षांपासून औषध पुरवठा बंद;लोकप्रतिनिधी झोपेत

२० ऑगस्ट अकोला: अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जवळपास गेल्या दिड वर्षांपासून संबंधित कंपनीने औषध पुरवठाच केला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार औषधांवीना कसा चालत असेल याचा विचार न केलेलाच बरा! अकोला सर्वोपचार रुग्णालयात मोठे सेंटर म्हणून अकोला जिल्ह्यासमवेत वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातून शेकडो रुग्ण मोठ्या आशेने येत असतात. येथे आल्यानंतर

Read more
Dams-in-Pune
महाराष्ट्र विदर्भ

Monsoon : राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची हजेरी

२० ऑगस्ट अकोला : राज्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण ३५५ तालूक्यांपैकी ० तालुक्यात ० ते २५ टक्के, १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के, १०७ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, १४६ तालुक्यामध्ये ७५ ते १०० टक्के आणि ८९ तालुक्यात १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस ( Monsoon ) झाला आहे. त्याचप्रमाणे नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा,

Read more
विदर्भ

पश्चिम विदर्भात ८ लाख हेक्टरवरील पेरण्या अडचणीत; पावसाची पाठ

अमरावती, 5 जुलै : यंदा मोसमी पावसाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने पश्चिम विदर्भातील सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. यंदा आतापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. विभागात अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात जमिनीतील ओलावा पाहून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पावसाच्या अंदाजानंतरही पाऊस बरसला नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सुमारे २४ लाख हेक्टरवरील खरिपाची

Read more
samruddhi-mahamarg समृद्धी महामार्ग
नागपूर विदर्भ

समृद्धी महामार्गावर कंटेनरने चिरडले, लेकाचा मृत्यू वडिलांनी डोळ्याने पाहिला

नागपूर : सिंदखेडराजा येथील विदर्भ ट्रॅव्हल्सला लागलेल्या भीषण आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताच्या दुसर्‍या दिवशी रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हिंगणा पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या समृद्धी महामार्गावरील झिरो पॉइंट परिसरातील बगीच्याजवळ पुन्हा एक अपघात झाला. जिथे एका कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिली.या अपघातात गवत कापणारे दोन मजूर ट्रॅक्टर आणि ग्रीलखाली दबले गेले. या अपघातात वडील

Read more
विदर्भ

पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील दोन दिवस विदर्भासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळं

Read more