कृषी

प्रतिक साबे यांना आदर्श युवा शेतकरी पुरस्कार जाहीर…!

मोताळा : तालुक्यातील ग्राम आडविहीर येथील प्रतिक साबे पाटील यांनी शेती मध्ये बदल घडवीत यशस्वी कृषी पूरक उद्योग – व्यवसायांच्या माध्यमातून प्रगती साधतं शेतकऱ्यापुढे, नवयुवकांपुढे आदर्श निर्माण केला.

त्यांच्या कृषी पूरक उद्योग-व्यवसायाबाबत राज्यातील विविध ठिकाणहून लोकं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेस.प्रतिक साबे पाटील हे त्यांच्या कार्यातून नेहमीच चर्चेत असतात त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी मोताळा तालुक्यात यशस्वी मशरूम फार्म उभारला होता, त्याची दखल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाणे घेऊन त्यांच्या फार्म ला भेट दिली व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला . प्रसार माध्यमातून त्यांची व त्यांच्या फार्मची गाथा प्रसारित झाली होती. तेव्हा पासून प्रतिक यांना लोकप्रियता मिळत गेली.

पुढील पशु वैदकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांना त्यांचा मशरूम फार्म बंद करावा लागला. प्रतिक यांनी तीन वर्षां आधी त्यांचे पशु वैदकीय शिक्षण सुरु असतांनाच त्यांच्या शेतात आपल्या अभ्यासिक अनुभवातून बंदिस्त शेळीपालन, गावरान कुक्कुट पालन, ससेपालन, गायपालन यांसारखे विविध कृषिपूरक उद्योग एकाच ठिकाणी उभारून यशस्वी केले. व त्यातून अगदी कमी वयात उत्तम प्रगती साधली.

त्यांची शून्यातून केलेली सुरुवात आज यशाच्या शिखरावर पोहचली. प्रतिक स्वतः वेटर्नरी असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाचा फायदा त्यांनी योग्य रित्या करून घेतला. ग्रामीण भागात पशु रुग्ण सेवेचे कार्य प्रतिक करतात.

भारत सरकारच्या NDDB प्रकल्पामध्ये देखील ते Artificial Insuminition Technician म्हणून कार्यरत आहेस.उच्च शिक्षण घेऊन “न समृद्धी कृषीर विना, न कृषी पशुविना” या ब्रीद वाक्यावर त्यांनी शेतकऱ्यांना शेती कशी परवडू शकेल, युवकांनी पारंपरिक शेतीत बदल करीत कश्याप्रकारे उद्योगाच्या वाटा निर्माण करू शकता याचे प्रत्यक्ष उदाहरणं समाजापुढे मांडले.

त्यांच्या या कार्यांची दखल घेत कृषी सेवक तर्फे त्यांना युवा शेतकरी पुरस्कार जाहीर झाला.७ जानेवारीला रावेर येथे मा.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व मा.कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे..!