Maharashtra Military School Murbad
महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मुरबाड दि. २६ : स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती व्दारा संचलीत, महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड मध्ये, दिनांक २६ फेब्रुवारी- २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिना निमित्ताने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना पत्र देऊन सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

Maharashtra Military School Murbad

स्पर्धेसाठी तालुक्यामधील विविध शाळांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड येथे मागील २५ वर्षापासून स्कूलच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिना निमिताने या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सन २००५ पासून, अधिवक्ता कै. अशोक इनामदार स्मृती चषक देऊन स्पर्धकांना गौरविण्यात येते. यापूर्वी तालुक्यातील विविध शाळांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळवली आहेत. या वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासह वक्तृत्व कलेस प्रोत्साहन देणे हा आहे.

Maharashtra Military School Murbad

स्पर्धेसाठी गट ‘अ’ वर्ग ५ वी ते ७वी गट ‘ब’ वर्ग ८ वी ते ९ वी चे स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास प्रमाणपत्रासह पारितोषिके (सन्मान चिन्ह) व अधिवक्ता कै.अशोक इनामदार स्मृती चषक देवून गौरविण्यात येते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धासाठी प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे जिल्ह्यातील एक प्रसिध्द निवेदक, उत्कृष्ट वक्ते, सावरकर भक्त, व सेवा निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा. श्री. रुपचंदजी झुंजारराव (अंबरनाथ) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते,

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Maharashtra Military School Murbad

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य मा. श्री. काशिनाथजी भोईर सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित सर्व स्पर्धक विद्यार्थी आणि शिक्षकांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. आणि या स्पर्धा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला आणि सद्यस्थितीत शाळेय विद्यार्थ्यांनी स्वा. सावरकर यांच्या विषयी का वाचले आणि ऐकले पाहिजे याविषयी आपले विचार व्यक्त केले आणि स्पर्धेचे नियम व गुणांकन याविषयी माहिती दिली.

मागील काही वर्षांत या स्पर्धेसाठी अनेक नामवंत व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.माजी शिक्षक आमदार कै.प्र.अ. संत सर व श्री. वसंत पुरोहित सर यांनी या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे याची आठवण त्यांनी करून दिली. स्वा. सावरकरांविषयी अनेक पैलूंवर, अनेक विषयांवर विद्यार्थ्यांची दिमाखदार आणि माहितीपूर्ण भाषणे झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. रुपचंदजी झुंझारराव यांनी उपस्थितांना संबोधित केले. उपस्थित स्पर्धकांना मार्गदशन करतांना मा. श्री. रुपचंदजी झुंजारराव सर म्हणाले की, आजची स्पर्धा ही एक मोठी उत्कृष्ट व्याख्यानमाला आहे असे वाटते. आशा स्पर्धाच्या आयोजनामुळे भावी काळात उत्कृष्ट वक्ते तयार होतील आणि सोबतच देशभक्तीची ज्वाला विद्यार्थ्यांच्या मनात तेवत राहील यात शंका नाही.

Maharashtra Military School Murbad

विद्यार्थ्यांची भाषणे आणि त्यांचे सावरकरांवर बोलण्याचे धाडस आणि विचार पाहून सावरकर या शब्दाचाच अर्थ देशभक्ती आहे हे पटायला लागते. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल हे सावरकरांच्या विचार प्रसाराचे एक व्यासपीठ आहे. असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक होते. स्वा. सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती व देशाभिमान यांचा आदर्श या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. असे ही ते पुढे म्हणाले. शाळेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या या हे प्रेरणादायी कार्याचा प्रसार आणि प्रचार मागील पंचविस वर्षापासून सातत्यपणाने केला जात आहे या साठी शाळेच्या या कार्याचा विषेश उल्लेख करुन शाळेच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Maharashtra Military School Murbad

कार्यक्रमाच्या शेवटी वक्तृत्वस्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा. सौ. किशोरी भोईर व श्री खंडू भोईर सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. प्रमोद देसले सर यांनी केले. रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा अपेक्षेपेक्षाही जास्त स्पर्धेकांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला.आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली.

कार्यक्रमासाठी शाळांचे स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थीनी त्यांचे शिक्षक, पालक, शाळेचे सर्व विभागामधील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.