विदर्भ

*रक्ताच नातं ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व शासकीय रुग्णालय अकोला येथील डॉक्टरांचा कोरोना योध्दा सत्कार सोहळा संपन्न

  1. अकोला प्रतिनिधी१६ऑगस्ट:-गेल्या दिड ते दोन वर्षांपासून पुर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना या महामारिमुळे पुर्ण जणता, प्रशासन त्रस्त झालेल आहे या काळात खुप लोक मरण पावली अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली कोणाला उपचार योग्य मिळाला कोणाला नाही आणि या सर्व काळात अकोला येथील सरकारी रुग्णालयातील अनेक वेळा रक्ताचा तुटवडा सुध्दा पडला अशा मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये काहि युवा तरुण या सर्व परिस्थितीला पाहुन लोकांच्या मदतीला धावून जाऊ लागले ते म्हणंजे रक्ताच नातं ग्रुप अकोला चे संस्थापक अध्यक्ष विजय गावंडे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने लोकांना मदत करणं सुरु केले नेहमी प्रमाणे याहि वर्षि रक्ताच नातं ग्रुप च्या वतीने विजय गांवडे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय रुग्णालय अकोला येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते व अहोरात्र आपल्या ड्युटी निस्वार्थ पणे निभावणारे शासकीय डॉक्टरांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान रक्ताच नातं ग्रुप च्या माध्यमातून करण्यात आले त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.पै.करण साहु, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.सौ. मिनाक्षी गजभिये (एम डि,रेडिओ डायग्नोसिस) अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वो.रुग्ना.अकोला,
    छत्रपती सेनेचे जिल्हाध्यक्ष मा.नितीन मानकर,
    डॉ.आरती कुलवाल अधिक्षक लेडि हार्डिंग,हे होते व सत्कार मुर्ति म्हणून डिन मँडम,व डॉ.अजय जुनगरे, डॉ.दिलीप सरकटे, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख शा.वै.महा.सर्वो.रुग्ण.अकोला, डॉ.दिनेश नैताम (उपअधीक्षक), डॉ.शिल्पा तायडे(रक्तपेढी समन्वयक),उमेश रामटेके स्वच्छता निरीक्षक, डॉ.विनीत वरठे, इत्यादी लोकांचे सत्कार करण्यात आले ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित म्हणून लाभलेले रुग्णसेवक नितीन सपकाळ, रुग्णसेवक अशिष सावळे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण हटकर यांनी केले तर आभार रुग्णसेवक आशिष सावळे यांनी मानले