अकोला

न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

अकोट: तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट न्यायालयात राष्ट्रीय महिला आयोगानुसार महिलांचे सशक्तीकरण याविषयी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यकमास श्री चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, जिल्हा न्यायाधीश – १ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, अकोट, श्री बि. बि. चौहान, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अकोट, श्री विनायक एम. रेडकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, सुरेंद्र पोटे, (अध्यक्ष विधीज्ञ संघ), विजय चव्हाण (सचिव, विधीज्ञ संघ) अँड सतीश उगले, अँड. किशोर देशपांडे, अँड.रतन पळसपगार तसेच विधीज्ञ वर्ग, न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीया कार्यक्रमाला वक्ते म्हणून अँड. कु. हर्षलता नाथे ,सौ. स्नेहल दिपक अभ्यंकर, सौ. नेहा नितीन झाडे या उपस्थित होत्या.सर्व वत्तäयांनी महिलांचे सशक्तीकरण याविषयी सर्व उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता विजय जितकर (सामाजिक कार्यकर्ते) न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अँड. विशाखा वासनिक, (विधीज्ञ),प्रास्ताविक अँड. राजेश तायडे (विधीज्ञ),तर आभार प्रदर्शन हेमा सभागचंदाणी (विधीज्ञ) यांनी मानले.