shiv-mahapuran
मराठवाडा

जि प नगर येथे शिवमहापुराण कथा व गाथा पारायनाचे आयोजन

अकोला : स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला येथील श्री हनुमान मंदिर व श्री गजानन महाराज मंदिर यांच्या प्राणांगणामध्ये ह भ प गुरुवर्य सारंगधर महाराज मेहूनकर श्री संत आदिशक्ती मुक्ताई संस्थान मेहून( तापीतीर) यांच्या मार्गदर्शनात रविवार दिनांक २६ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ५ मार्च पर्यंत शिवमहापुराण कथा व गाथा पारायण झाकीसह दररोज सायंकाळी ७.३० ते १० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

कथा प्रवत्तäया म्हणून सुश्री शोभनाताई एम. ए .पी. एच .डी . प्राध्यापिका विधी महाविद्यालय नागपूर यांच्या वाणीतून सादरीकरण होणार आहे .याला तबलावादक म्हणून विशाल नायडू नागपूर ,गायक पंकज रंगारी नागपूर, जि प नगरचे ख्यातनाम गायक गजानन जळमकार , तबलावादक गवळी उपस्थित राहणार आहेत. तर गाथा पारायण मार्गदर्शक म्हणून तांदळी बु. चे ह भ प देविदास महाराज टापरे हे उपस्थित राहणार आहे. रोज सकाळी पाच ते सहा काकडा, सकाळी सहा ते सात आरती तर सकाळी दहा ते बारा गाथा पारायण, दुपारी तीन ते पाच गाथा पारायण, हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा , संध्याकाळी सहा ते सात आरती, संध्याकाळी साडेसात ते दहा पर्यंत शिवपुराण कथा झाकी सह सादरीकरण होणार आहे.

रविवार दिनांक ५ मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा काल्याचे किर्तन ह भ प गुरुवर्य सारंगधर महाराज मेहूनकर यांचे होणार आहे. गायनाचार्य म्हणून ह भ प श्याम महाराज धनोकार खिरपुरी बु., ह भ प सागर महाराज पुरी, मृदंगाचार्य ह भ प गोवर्धन महाराज भाकरे चातारी, ही आपली सेवा देणार आहेत. त्या संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ह भ प नारायण महाराज कुठे, ह भ प मनोहर महाराज डुकरे, ह भ प .ताराळे महाराज , ह भ प नंदू महाराज इंगळे चांदूर राहणार आहेत.

तसेच गजानन महाराज महिला भजनी मंडळ साने गुरुजी नगर, माऊली महिला भजन मंडळ जि प नगर, पुरुष भजनी मंडळ खडकी, गायत्री नगर, कान्हेरी, कौलखेळ, कावसा ,केळीवेळी यांचे वारकरी चमू सुद्धा उपस्थित राहून सेवा देणार आहेत. तरी या शिवमहापुराण कथा व गाथा पारायनाला खडकी पंचकोशीतील नागरिक महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त जिल्हा परिषद नगर वाशी खडकी बु. अकोला यांनी केले आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाजसेवक गजानन हरणे यांनी कळविले आहे.