RTE
अकोला

जिल्ह्यात आरटीई प्रवेश: १,९४६जागांसाठी ५,३६० अर्ज

अकोला: आरटीई नुसार खासगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात १९४६ राखीव जागांसाठी५३६० अर्ज बुधवार सायंकाळपर्यंत दाखल करण्यात आले.

जिल्ह्यात प्रवेशासाठी १९० खासगी शाळा आहेत. या प्रवेशासाठी ५३६० जागा आहे. दरवर्षी उपलब्ध जागेच्या तुलनेत तिप्पट अर्ज पालकांकडून दाखल करण्यात येतात. त्यामुळे यंदाही दोन दिवस शिल्लक असले तरी दुपटीपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत राज्यातील दुर्बल, वंचित घटकांतील मुलांना खासगी शाळांत राखीव असणार्‍या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला १ मार्चपासून सुरुवात झाली. त्यामुळे पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

मागासवर्गीय प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादेची अट नाही. त्यांनाजातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. असे असल्याने मागासवर्गीय प्रवर्गातील अल्प उत्पन्न, नोकरीवर नसलेल्यांनी अर्ज करणे आवश्यक असताना जादा उत्पन्न असलेले नोकरीवर असलेले प्रवेशासाठी पुढे आहेत.

त्यांच्या अर्जामुळे दुर्बल घटक प्रवेशापासून वंचित राहत आहे. त्यामुळे या प्रवर्गातीलहोणारे प्रवेशांची चौकशी होणार आहे.राज्यातील ८ हजार ८२७ खासगी शाळेमध्येप्रवेशासाठी १ लाख एक हजार ९६९ जागा आहेत. त्यासाठी यंदा मुदत संपण्याच्या दोन दिवसांपूर्वीच २ लाख ८६ हजार पालकांनीआपल्या पाल्याचे २ लाख ८६ हजार ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. उर्वरितदोन दिवसांचा आकडा तीन लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे.