क्राईम

कार मधुन गोंवशाची चोरी करणारी टोळी जेरबंद.!

अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

अकोट शहर पोलिसांची ही मदत…

अकोट उपविभागातील अकोट, हिवरखेड, दहीहंडा परिसरातून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गोंवश चोरीच्या घटना घडल्या होत्या.काही ठिकाणी सी सी टी व्ही मध्ये कार मधुन गोंवशाची चोरी करताना घटना कैद झाल्या आहेत.गोंवश चोरीच्या वाढत्या

घटनेच्या अनुषंगाने अकोट ग्रामीण पोलिसांनी तपास चक्र फिरवत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अकोट ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले.1)कुदरत खा .उर्फ जावेद अहेसान खा.वय 22 वर्ष, रा. मजेतीय प्लॉट अकोट 2) रमीज राजा उर्फ सोनू अब्दुल नासिर पटेल, वय 22 वर्ष, रा. वडाळी सटवाई.ह्या आरोपींना दिनांक 13/03/ 2023 रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच नमूद आरोपींना मा. न्यायालयाने दिनांक 16/03/2023 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला आहे. तसेच नमूद आरोपींकडून गोवंश चोरीसाठी वापरण्यात TATA इंडिगो गाडी जपत करण्यात आले आहे. तसेच गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध अकोट ग्रामीण पोलीस घेत आहेत.

ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर मॅडम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पो. हे .कॉ उमेश सोळंके, पो .कॉ. गोपालसिंग दाबेराव, पो. कॉ.उमेश सोळंके ह्यांनी केली.